Home गडचिरोली पोलिस मदत केंद्रा गट्टा तर्फे ‘पोलिस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा संपन्न

पोलिस मदत केंद्रा गट्टा तर्फे ‘पोलिस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा संपन्न

96

पोलिस मदत केंद्रा गट्टा तर्फे ‘पोलिस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा संपन्न

 

गट्टा | पोलिस मदत केंद्रातर्फे पोलिस दादालोरा खिडकी या जनजागृती उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गट्टा येथे निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम, जाणीव व अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा “मराठी भाषेचे महत्त्व आणि आजची गरज” या विषयावर घेण्यात आली.

 

या स्पर्धेत शाळेतील विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मातृभाषेचे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधातून प्रभावीपणे मांडले. आधुनिक युगात मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांच्या लेखनातून ठळकपणे दिसून आली.

 

स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण केल्यानंतर खालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले—

 

प्रथम क्रमांक : दमयंती व्यंकटी कोंडागुर्ले (इयत्ता 8 वी)

 

द्वितीय क्रमांक : बादल साधू नवडी (इयत्ता 7 वी)

 

तृतीय क्रमांक : अंशिका सुरेश पुंगाटी (इयत्ता 7 वी)

 

 

या कार्यक्रमास श्री. धुर्वे सर, टेकाम सर, गोटा सर, सीमा मॅडम, नरोटी सर तसेच मुख्याध्यापक श्री. बेडके सर यांची उपस्थिती लाभली. तसेच पोलिस मदत केंद्राचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याचे आणि विषयमांडणीचे विशेष कौतुक केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून मराठी भाषेबद्दल अधिक आपुलकी निर्माण झाली. पोलिस दादालोरा खिडकी या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन व शाळा यांच्यातील समन्वय अधिक दृढ होत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येतील, असे यावेळी नमूद करण्यात आले.

Don`t copy text!