पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा
. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार तसेच वेगवर्धित पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदार यांना पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान
. पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पथसंचलन व चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर
. दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी बिनागुंडा गावात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोमकें बिनागंुडा येथे देखील राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा
. मौजा बिनागुंडा येथील दहशतीचे प्रतीक असणारे माओवाद्यांचे स्मारक करण्यात आले नष्ट
दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात येवून भारत देश एक प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र बनला. प्रजासत्ताक दिन हा भारतातील सर्वात महत्वाचा राष्ट्रीय उत्सव असून, दरवर्षी संपुर्ण देशामध्ये 26 जानेवारी रोजी प्रजासत्तक दिन मोठ¬ा उत्साहात साजरा केला जात असतो. आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक अभियान श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 31 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. महामहिम राष्ट्रपती यांचे शौर्य पदक प्राप्त झाले असून या कार्यक्रमाप्रसंगी शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. यासोबतच विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) नागपूर यांच्या आदेशान्वये वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या 10 पोलीस अंमलदारांना देखील प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. माओवाद विरोधी अभियानात आपल्या शौर्याचे प्रदर्शन करणाया या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी कौतूक करून उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व यानंतर शहीद कुटुंबियांची भेट घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हयाचे सह पालकमंत्री मा. अॅड. श्री. अशिष जयस्वाल यांचे हस्ते राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दल व विविध शालेय विद्यार्थांकडून पथसंचलन तसेच चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व सांस्कृतीक कार्यक्रम पार पडला.
गेल्या एका वर्षात नव्याने उभारण्यात आलेल्या पोस्टे नेलगुंडा, कवंडे, तुमरकोठी, पोमके फुलणार येथे देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी बिनागुंडा गावात नव्याने उभारण्यात आलेले अतिदुर्गम पोमकें बिनागुंडा येथे देखील पहिल्यांदाच अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधिरा, उप-कमांडण्ट 09 बटा. सिआरपीएफ श्री. योगेंद्र धाकोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते तसेच मौजा बिनागुंडा, कुवाकोडी, पेरमिलबट्टी, पुंगासूर, फोदेवाडा व इतर गावातील ग्रामस्थ व शालेय विद्याथ्र्यांच्या उपस्थितीत मोठ¬ा उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येवून मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच मौजा बिनागुंडा येथील विनोबा प्राथमिक आश्रम शाळा येथे अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. कार्तिक मधिरा यांच्या हस्ते इतर वरिष्ठ अधिकारी व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. जे. शेख, इतर शिक्षक वृंद, शालेय विद्यार्थी तसेच वैद्यकीय स्टाफ यांचे उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी विनोबा आश्रम शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी आदित्य पोदाडी याने देशभक्तीपर वातावरणात महाराष्ट्र गीत सादर केले. तसेच यावेळी आश्रम शाळेलगतच माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले माओवाद्यांचे स्मारक देखील वरीष्ठ अधिकायांच्या उपस्थितीत बिडीडीएस पथक, सि-60 पथक व पोमके बिनागंुडा येथील पथकाद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी स्थापन करण्यात आलेल्या पोस्टे तुमरकोठी येथे पोलीस अधिकारी, जवान व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येवून शालेय विद्याथ्र्यांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गावकयांसमवेत राष्ट्रध्वज फडकवून जिल्हाभरात मोठ¬ा उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे.








