Home Breaking News  पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री. सदानंद दाते यांनी दिली अतिसंवेदनशिल नवनिर्मित पोमकें बिनागुंडा...

 पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री. सदानंद दाते यांनी दिली अतिसंवेदनशिल नवनिर्मित पोमकें बिनागुंडा येथे भेट

84

 

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री. सदानंद दाते यांनी दिली अतिसंवेदनशिल नवनिर्मित पोमकें बिनागुंडा येथे भेट

 

• अतिसंवेदनशिल नवनिर्मित पोमकें बिनागुंडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला भव्य महाजनजागरण मेळावा

• मान्यवरांच्या हस्ते पार पडले पोस्टे वांगेतुरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

• गडचिरोली पोलीस दलातील वेगवर्धित पदोन्नती प्राप्त अधिकारी तसेच शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मा.पोलीस महासंचालक यांच्या हस्ते करण्यात आला गौरव

——————————————————————————

 

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांचा काल दिनांक 31/01/2026 रोजी गडचिरोली दौरा पार पडला. यावेळी त्यांनी दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोमकें बिनागुंडा येथे भेट देऊन येथील अभियानाच्या तयारीची पाहणी केली आणि उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधला.

 

यासोबतच पोमकें बिनागुंडा हद्दीतील नागरिकांसाठी पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते व अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे व इतर वरीष्ठ अधिका­यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य महाजनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या आयोजित केलेल्या महाजनजागरण मेळाव्यात हजर नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लॅकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्याथ्र्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपास, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात अतिदुर्गम पोमकें बिनागुंडा हद्दीतील 500 हून अधिक नागरीक उपस्थित होते. *यावेळी विनोबा आश्रम शाळा, बिनागुंडा येथील दुसरीत शिकणारा विद्यार्थी आदित्य पोदाडी याने उपस्थित नागरिकांसमक्ष महाराष्ट्र गीताचे सुरेख सादरीकरण केले.* उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना पोलीस महासंचालक म. रा. श्री. सदानंद दाते यांनी सांगितले की, या नवीन पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातर्फे विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ येथील नागरीकांना देण्यात येईल. या अतिदुर्गम भागामधील नागरीकांच्या सुविधेसाठी लवकरच येथे रस्ते, आरोग्य सेवा व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच पोलीस दल येथील नागरीकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन येथिल नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहिल. तसेच यानंतर भोजन प्रसंगी मा. पोलीस महासंचालक यांनी इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोमके बिनागुंडा येथे कर्तव्य बजावणारे सीआरपीएफ, एसआरपीएफ व गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे सोबत भोजन केले.

 

या भेटी दरम्यानच पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते व अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या हस्ते पोस्टे वांगेतुरी येथील नवीन प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. सदर सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतींमूळे अतिदुर्गम भागात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

यानंतर पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृह येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी कसनासूर-बोरीया येथे माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करणा­या एकूण 31 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जाहिर झाले असुन या शौर्यपदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना मा. पोलीस महासंचालक म. रा. श्री. सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्रात कर्तव्य बजावत असतांना उत्कृष्ट कामगिरी बजावणा­या एकूण 05 पोलीस उपनिरीक्षक यांना गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली असून या अधिकारी व अंमलदार यांचा मा. पोलीस महासंचालक म. रा. श्री. सदानंद दाते यांचे हस्ते घ्त्द्रद्रत्दढ़ समारंभ पार पाडला. यावेळी मा. पोलीस महासंचालक म. रा. श्री. सदानंद दाते यांनी सर्व शौर्यपदक प्राप्त व सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धीत पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकारी व अंमलदार तसेच उपस्थित सर्व विशेष अभियान पथकातील सर्व जवानांसोबत संवाद साधत माओवाद विरोधी अभियानाबाबत चर्चा केली व जवानांच्या अडचणी समजून घेवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की, ‘‘गडचिरोली जिल्ह्रात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणा­या अधिकारी व जवान यांचे बलिदान नेहमीच स्मरणात राहिल. तसेच अवघड परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावत असताना देखिल सर्वांनी आपल्या समोर मोठे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकतेने काम करावे.’’ तसेच यावेळी मा.पोलीस महासंचालक यांनी पदोन्नती प्राप्त व शौर्यपदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देऊन उपस्थित सर्वांचे मनोबल उंचावणारे मार्गदर्शन केले.

 

या सर्व कार्यक्रम प्रसंगी पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरिक्षक, नक्षल विरोधी अभियान, श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरिक्षक,रा.रा.पो.ब. नागपूर परिक्षेत्र, श्री. निसार तांबोळी, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक सिआरपीएफ श्री. अनिल कुमार, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) श्री. गोकुल राज जी., सहायक पोलीस अधीक्षक धानोरा, श्री.अनिकेत हिरडे., पोलीस उपअधिक्षक (अभियान), श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!