Home Breaking News इंदापूर मौजे निमसाखर गावामध्ये माघ पौर्णिमा अति उत्साहात साजरी

इंदापूर मौजे निमसाखर गावामध्ये माघ पौर्णिमा अति उत्साहात साजरी

50

प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर मौजे निमसाखर गावामध्ये माघ पौर्णिमा अति उत्साहात साजरी करण्यात आली या पौर्णिमेनिमित्त गावामधून श्री स्वामी समर्थांची पालखी ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली ग्राम प्रदक्षिणा मार्गावर स्वामीभक्त महिलांनी चौका चौकामध्ये रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले पालखी प्रदक्षिणेमध्ये महादेव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर श्री स्वामी समर्थांची आरती व जपमाळ घेण्यात आली त्यानंतर सर्व स्वामी भक्तांना श्री भगवान मुगाजी बागुल यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला या कार्यक्रमास निमसाखर परिसरातील सर्व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Don`t copy text!