Home गडचिरोली *सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा*

*सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा*

46

*सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा*

*’कोया कृषी कुंभ’ महोत्सवाच्या उद्घाटनासह विविध विकासकामांचा घेणार आढावा*

गडचिरोली दि. ४ : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून जिल्हयातील महत्त्वाच्या विभागांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वा. ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या कार्यक्रमास सोनापूर येथील कृषी महाविद्यालय प्रांगणात उपस्थिती, दुपारी १.०० वा. जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिव्यांग प्रमाणपत्र एकत्रित वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात गडचिरोली जिल्ह्यातील ‘पाणंद रस्ते’ संदर्भातील आढावा बैठक. दुपारी ३.३० वा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व पणन महासंघ विभागाची आढावा बैठक. संध्याकाळी ४.०० वा. गडचिरोली नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची भेट आणि नगर परिषदेच्या कामाची आढावा बैठक. सायं ५ वा. रामटेककडे प्रयाण.

Don`t copy text!