Home गडचिरोली _*चिचखेडा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा: मुल संघाने पटकावले विजेतेपद*_

_*चिचखेडा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा: मुल संघाने पटकावले विजेतेपद*_

63

_*चिचखेडा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा: मुल संघाने पटकावले विजेतेपद*_

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण सोहळा संपन्न*_

 

ब्रम्हपुरी / प्रतिनिधी :

_चिचखेडा येथील युवा क्रिकेट क्लबच्या सौजन्याने आयोजित आमदार चषक भव्य रबरी बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. दिनांक 18 जानेवारी 2026 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना युवा क्रिकेट क्लब चिचखेडा आणि राईज सिटी क्रिकेट क्लब, मुल संघ यांच्यात रंगला. अंतिम सामन्यात रोमांचक खेळाचे प्रदर्शन करत मुल संघाने चिचखेडा संघावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत चिचखेडा संघाने उपविजेतेपद, तर वाडोणा संघाने तृतीय स्थान पटकावले._

_*या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.*_

_यावेळी प्रमुख अतिथी आणि मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, उपाध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून.विलास जांभुळे पो.पा.चिचखेडा,नितीन गजबे उपसरपंच कळमगाव,महादेव नन्नावरे मा.ग्रा.प.सदस्य चिचखेडा,लोकेश चौके उपसरपंच चिचखेडा,देवंगनाताई ठाकरे ग्रा.प.सदस्या चिचखेडा, धनराज मांदाळे ग्रा.प.सदस्य चिचखेडा,पितांबर शेन्डे,प्रदिप गुरुनुले,गोलु राऊत,दिनेश खेवले,प्रज्वल डोर्लीकर,नंदु हनवते,पवन जांबुळे,शेखर चौधरी,आदी मान्यवरांची उपस्थिती होती._

_बक्षीस वितरणप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रमोदभाऊ चिमूरकर यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे स्थानिक तरुणांना सकारात्मक दिशा मिळते, खेळाच्या माध्यमातून सामाजिक साक्षरता वाढते आणि युवकांच्या कौशल्याला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले._

_या स्पर्धेत विजेत्या संघाला विजेता संघ (मुल) – ₹41,000 रोख, उपविजेता संघ (चिचखेडा) – ₹30,000 रोख, तृतीय संघ (वाडोणा) – ₹17,000 रोख पारितोषिक देण्यात आले. याशिवाय, वैयक्तिक पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट किपर, बेस्ट कवर ड्राइव्ह, प्रथम हॅट्रिक, बेस्ट फिफ्टी, बेस्ट अंपायर इत्यादी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले._

_ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली. मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहून खेळाचा आनंद घेतला. उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा यशस्वी झाली. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी व खेळसंस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा असल्याचे सर्व उपस्थितांनी एकमताने व्यक्त केले._

Don`t copy text!