एटापल्ली पं.स.मध्ये कार्यरत शिक्षक सुरेश वझे यांचा कोरोनाने मृत्यू

1316

एटापल्ली पं.स.मध्ये कार्यरत शिक्षक सुरेश वझे यांचा कोरोनाने मृत्यू

गडचिरोली: एटापल्ली पं.स. अंतर्गत कसनसुर केंद्रातील गटेपल्ली येथे कार्यरत शिक्षक सुरेश वझे वय 53 मु.मानापूर ता.आरमोरी जिल्हा गडचिरोली यांचा आज कोरोनाने मृत्यू झाला. त्यानी नुकताच काही दिवसांपूर्वी कसनसुर येथे पहिली लस घेतली होती.नंतर त्यांना दोन दिवसांनी ताप आला ताप कमी होत नाही म्हणून त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यांना आरमोरी येथील कोरोना केंद्रात भरती करण्यात आले .कालच त्यांना रात्री गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले . त्यांना दोन मुले,पत्नी,आई. दोन भाऊ बराच मोठा आप्त परिवार आहे.अशा त्यांच्या अकाली जाण्याने व यापूर्वी सुद्धा बऱ्याच शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने शिक्षकांमध्ये दुःखाचे सावट व धास्ती निर्माण झाली आहे.