Home Breaking News “केंद्र स्तरीय शिक्षण परिषद कोठी येथे उत्साहात संपन्न

“केंद्र स्तरीय शिक्षण परिषद कोठी येथे उत्साहात संपन्न

85

“केंद्र स्तरीय शिक्षण परिषद कोठी येथे उत्साहात संपन्न”

एटापल्ली: वृत्तवानी न्यूज

एटापली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कसन्सूर केंद्रातील मासिक केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दिनांक 20 फेब्रुवारी 2026रोजी शुक्रवारी कोठी हालेवारा केंद्र कसन्सूर तालुका एटापली येथे पार पडली.

सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला श्री सन्माननीय डॉक्टर प्रभाकरजी साखरे सर केंद्रप्रमुख( कसनसूर व कोटमि केंद्र) यांनी पुष्पहार अर्पण केला तर थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या प्रतिमेला सन्माननीय शिरीष इरावार सर यांनी पुष्पहार अर्पण केला. सुरुवातीला श्री साखरे सरांचे स्वागत श्री मंडल सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरसु किरंगा यांचे स्वागत श्री वाकडे सर यांनी केले.

वारली किरंगा मॅडम यांचे स्वागत किरिपा कुजूर मॅडम यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री अखिलेश किरंगा (ग्रामपंचायत सदस्य कोठी) यांचे स्वागत श्री कावरे सर यांनी केले.

श्री सुरेश किरंगा यांचे स्वागत श्री उसेंडी सर यांनी केले तर श्री बाबुराव किरंगा यांचे स्वागत श्री चनावार सर यांनी केले.

मूल्यवर्धन मार्गदर्शक श्री चापले सरांचे स्वागत श्री सरवर यांनी केले.

स्वागत समारंभ नंतर “नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम” सादरीकरण या विषयावर श्री राजू नरोटे सर व श्री रणजीत उंदीरवाडे यांनी माहिती सांगितली .

श्री मडावी सर यांनी “पीएम श्री व आदर्श शाळा “या विषयावर मार्गदर्शन केले.

 

“डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम “या विषयावर श्री रोशन कुलसंगे यांनी उत्कृष्ट सखोल विचार व्यक्त केले.

श्री दीपक जीवने व श्री राकेश मुंजुमकर यांनी “PAT चाचणी व HPC अंतर्गत अंमलबजावणी “बाबत मोलाची मार्गदर्शन केले.

 

“मूल्यवर्धन कार्यक्रमाची रुपरेषा व उद्दिष्टे” साध्य करण्यासाठी श्री चापले सर तालुका समन्वयक एटापली यांनी मार्गदर्शन केले.

 

श्री राहुल राजकोंडावार यांनी “निपुण भारत महाराष्ट्र अभियान बाबत शाळा निहाय विश्लेषण “बाबत सविस्तर माहिती सांगितली.

 

“NEP 2020 आढावा व अंमलबजावणी तंबाखूमुक्त शाळेबद्दल “श्री शिरीष इरावार व श्री डॉक्टर प्रभाकर साखरे यांनी वैचारिक चर्चेतून मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री लहू वेट्टी यांनी 22 तारखेला होणाऱ्या” शिष्यवृत्ती परीक्षेबाबत” मार्गदर्शन केले.

 

उपक्रमशील शिक्षक श्री उरकुडे सर व श्री संघर्ष गजबे सर यांनी “आनंददाई शनिवार उपक्रम “कसा राबवावा याबद्दल माहिती दिली.

 

कार्यक्रम सकाळी ठीक ११ वाजता राष्ट्रगीताने सुरु झाला तर सांगता वंदे मातरम या गीताने सायंकाळी पाच वाजता झाली.

💯सर्व शिक्षकांनी गणवेशात उपस्थिती दर्शवली.

 

मध्यंतरी च्या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठी येथील विद्यार्थ्यांशी डॉक्टर प्रभाकर साखरे यांनी हितगुज साधून संवाद केला व शाळा व्यवस्थापन बाबत समाधान व्यक्त केले.

ध्वनीक्षेपक यंत्रणा सुस्थितीत असल्यामुळे सर्व मार्गदर्शन LED📺 टीव्ही वर अतिशय उत्कृष्ट रित्या दाखवण्यात आले.

 

शिस्तबस्त बैठक व्यवस्था व आनंददायी वर्ग यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.

सर्व सहभागी मार्गदर्शक यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरसू किरंगा यांनी शाळेत होत असलेल्या नववोपक्रमशील कार्यक्रमाचे कौतुक केले.

 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठी च्या विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी मेहनत घेतली.

जेवणाची उत्तम व्यवस्था शाळेकडून करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री रंजीत उंदीरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मोहन गायकवाड यांनी केले.

 

 

शेवटी सुंदर नीटनेटके नियोजन, सर्वांचेच स्वागत,अत्याधुनिक तंत्राचा योग्य वापर करुन कार्यक्रमाचे देखणे नियोजन व कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठी चे विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक श्री बाबुराव नरसू गोटा यांचे व अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेले उपक्रमशील शिक्षक श्री मोहन गायकवाड यांचा सत्कार केंद्र प्रमुख डॉक्टर प्रभाकर साखरे यांनी केले.

 

संकलन व लेखन :

✒️📝श्री मुकेश धोंगडे.

Don`t copy text!