Home Breaking News डॉ.धर्मराव बाबा आत्राम आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री यांच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी...

डॉ.धर्मराव बाबा आत्राम आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री यांच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक हाती सत्ता स्थापित

378

*अहेरी नगर पंचायत स्थायी समिती सभापती निवडणूक दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पार पडली* या निवडणुकीत डॉ.धर्मराव बाबा आत्राम आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री यांच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक हाती सत्ता स्थापित करण्यात आली.

बांधकाम सभापती महेश बाकेवार, पाणी पुरवठा सभापती, विलास सीडाम, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. ज्योति ताई सडमेक यांची अविरोध निवड झाल्याने या शुभ प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रियाज भाई शेख यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुष्पमाला (फुलांचे हार) टाकून स्वागत केले या विजयात नगर उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांनी अविरोध विजय प्राप्त करण्यासाठी अधिक परिश्रम घेत शैलेश पटवर्धन यांनी चाणक्य पद्धतीने दोन दिवसांपूर्वी पासून रणनीती आखून शेवटी अविरोध विजय खेचून आणण्यास यश आले. विशेष म्हणजे यावेळी नगर उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांनी जबरदस्त कामगिरी बजावली असून या विजयाचा श्रेय आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात आणि आशीर्वादानेच बिनविरोध विजय मिळाले असे मत व्यक्त केले.आणि या प्रसंगी अहेरी नगराध्यक्षा रोजा करपेत यांनी सत्ताधारी सर्व सदस्यांना एकजूट ठेवून आपल्या युतीच्या सदस्यांना विजय मिळवून देण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे.तसेच या अविरोध विजयात नगर सेवक अमोल भाऊ मुक्कावार यांच्या अनुभव आणि मुख्य भूमिका असल्यानेच सदर विजय खेचून आणण्यास सोपे ठरले .

Don`t copy text!