भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्यासोबत गडचिरोली जिल्हा पदाधिकारी यांची संघटन बळकटीवर ठोस चर्चा
बैठकीदरम्यान सोशल मीडिया प्रमुख सुरज गुंडमवार यांची प्रदेशाध्यक्षांशी विशेष भेट
दिं. 21/02/2026
मुंबई येथे पार पडलेल्या “पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान” बैठकीदरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्याशी गडचिरोली जिल्ह्याचे सोशल प्रमुख सुरज गुंडमवार यांच्यासह जिल्हा पदाधिकारी यांनी विशेष भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण महाअभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बरसागडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील संघटन रचना, बूथस्तरावरील परिस्थिती , आणि आगामी प्रशिक्षण नियोजन याबाबत सविस्तर चर्चा केली. प्रदेशाध्यक्षांना माहिती दिली. गडचिरोली सारख्या दुर्गम व भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यात प्रत्येक बूथपर्यंत प्रशिक्षण पोहोचवून कार्यकर्त्यांना वैचारिक व संघटनात्मकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सुरज गुंडमवार यांनी भेटि दरम्यान जिल्हातील सर्व मंडल व बूथ पातळीवर समित्या स्थापण करून टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण पूर्ण केला जाईल. प्रत्येक कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या सक्षम, संघटनात्मकदृष्टा सजग आणि कार्यक्षम व्हावा, यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येईल
प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या कार्याचे कौतुक करत प्रशिक्षणाच्या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला. “मजबूत बूथ म्हणजे मजबूत संघटन” या विचाराची पुनरुज्जीविती करत त्यांनी नियोजनबद्ध आणि परिणामकारक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या.
या वेळी जिल्हाध्यक्ष रमेशजी बरसागडे, सह-संयोजक अनिल पोहनकर, सह-संयोजक अनिल तिडके, तसेच महिला मोर्चाच्या सीमा कन्नमवार उपस्थित होत्या. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण महाअभियान यशस्वी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
मुंबईतील या भेटीनंतर गडचिरोली जिल्ह्यात “पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान” अधिक जोमाने राबविण्यात येणार असून, तळागाळातील संघटन बळकट करण्यासाठी जिल्हा नेतृत्व सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.






