*अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना वैधकीय मदत कक्ष तालुका कार्यकारणी गठीत.*
*संपर्क प्रमुख सत्यपाल कुत्तरमारे आणि जिल्हा प्रमुख मणीकंठ गादेवार यांच्या हस्ते नवीन पदादीकरींची नियुक्ती*
*अहेरी:-* राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मा. खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि श्री. मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शना खाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा असे अहेरी विधानसभा क्षेत्राचे पाचही तालुका प्रमुख, तालुका उप प्रमुख कार्यकारणी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०%) राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे.असे गडचिरोली जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनीकंट गादेवार यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकारी सांगितले. सर्व कार्यकत्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
गंभीर-महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा. असेही जिल्हा संपर्क प्रमुख सत्यपाल कुत्तरमारे यांनी यावेळी सांगितले.






