Home Breaking News अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची तालुका कार्यकारणी जाहीर

अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची तालुका कार्यकारणी जाहीर

165

अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची तालुका कार्यकारणी जाहीर

 

एकनाथ शिंदे व डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या; गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत देण्यावर भर

 

 

अहेरी :-

अहेरी विधानसभा क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची तालुका कार्यकारणी अधिकृतपणे घटित करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच मार्गदर्शक श्री. मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व मुलचेरा या पाचही तालुक्यांतील प्रमुख व उपप्रमुखांची निवड करून नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख मणीकंठ गादेवार आणि संपर्क प्रमुख सत्यपाल कुत्तरमारे यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांतील राखीव खाटा उपलब्ध करून देणे, मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया मिळवून देणे तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतर्गत योग्य मार्गदर्शन करणे हे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

तसेच महागड्या शस्त्रक्रियांसाठी पात्र रुग्णांना पंतप्रधान व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदी माध्यमांतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नियुक्तीपत्र वितरणानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत समाजातील गरजू रुग्णांना अधिकाधिक मदत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

Don`t copy text!