Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी अतिदुर्गम तुमरकोठी ते अहेरी मार्गावर प्रथमच बससेवेला सुरुवात

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी अतिदुर्गम तुमरकोठी ते अहेरी मार्गावर प्रथमच बससेवेला सुरुवात

83

 

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी अतिदुर्गम तुमरकोठी ते अहेरी मार्गावर प्रथमच बससेवेला सुरुवात

 

* स्वातंत्र्यानंतर प्रथमच तुमरकोठी, तोयनार, मुरुमभुशी व शेजारील इतर अतिदुर्गम गावांना मिळणार बस सेवेचा लाभ

* नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवून नृत्य करुन वाजत गाजत बसचे केले स्वागत; शालेय विद्याथ्र्यांकडून राष्ट्रध्वज फडकवत आनंद साजरा

 

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्र व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमाअंतर्गत आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजा तुमरकोठी ते अहेरी मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली आहे.

भामरागडपासून सुमारे 30 कि.मी. व अहेरी पासून सुमारे 100 कि.मी. अंतरावर असणा­या मौजा तुमरकोठी येथील नागरिकांना तहसिल किंवा जिल्ह्राच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी गावात प्रथमच बस आल्यामुळे गावातील नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत वाजत गाजत बसचे स्वागत केले. यासोबतच शाळेतील लहान मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे तुमरकोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. गोरखनाथ सुरासे यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले. तसेच हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली व गावक­यांना शुभेच्छा दिल्या. सदर उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत कोठीच्या सदस्य श्रीमती भाग्यश्री लेकामी, गावपाटील श्री. रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी, राजु गावडे, तुमरकोठी जि.प. शाळेचे शिक्षक श्री. रामा लेकामी यांच्यासह एकूण 300 नागरिक उपस्थित होते. तुमरकोठी – कोठी – भामरागड – अहेरी या मार्गावर सुरु झालेल्या या बस सेवेमुळे या भागातील 450 ते 500 नागरिकांना लाभ होत त्यांचे जीवनमान सुसह्र होणार आहे.

बससेवा सुरु झाल्यामुळे गावातील विद्याथ्र्यांना शिक्षणाची सोय होऊन यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे. सदर मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमूळे गावक­यांना वर्षभर सहज प्रवास करता येणे शक्य होईल. सामान्य नागरिकांच्या दळण-वळणाच्या मुलभूत प्रश्नावर उपाय करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्हाभरामध्ये एकूण 559 मोबाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली असून, एकूण 424 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे आणि 65 पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मागील एक वर्षात गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने गट्टा (जा.) – गर्देवाडा – वांगेतुरी, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकणार ते अहेरी, आंबेझरी ते गडचिरोली मार्गावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवेचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल नागरिकांचे जीवनमान सुसह्र होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

 

पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी श्री. योगेश रांजणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफ 191 बटा एफ कंपनीचे पोनि. होनप्पा, पोस्टे तुमरकोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. गोेरखनाथ सुरासे, परिपोउपनि. आशिष मेश्राम व इतर अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Don`t copy text!