लग्नात 25 पेक्षा जास्त जणांची उपस्थित असल्याने अहेरी नगरपंचायतीने ठोठावला 50 हजार रूपयांचा दंड.

427

लग्नात 25 पेक्षा जास्त जणांची उपस्थित असल्याने अहेरी नगरपंचायतीने ठोठावला 50 हजार रूपयांचा दंड.

गडचिरोली-
लग्नसमारंभातुन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या 25 जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पाडण्याचा आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी अहेरी नगरपंचायतीने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

22 एप्रिल रोजी अहेरी नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चेरपल्ली वार्ड क्र.16 मध्ये सुरेश हनुमंतु आत्राम यांचे घरी आयोजित लग्नसमारंभास 50 ते75 लोक उपस्थित होते.शासनाने कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्यास लग्नसमारंभातील गर्दी कारणीभूत असल्याचे लक्षात आल्याने लग्न समारंभावर कठोर निर्बंध लादले.आणि या निर्बंधाची पायमल्ली केल्यास 50 हजार रुपयांची दंडाच्या रकमेची तरतुद केली.

लग्न उपस्थिती नियमांची पायमल्ली केल्याने अहेरी नगर पंचायतीने सुरेश हनुमंतु आत्राम यांच्यावर 50 हजाराचा दंड ठोठावून कारवाई केली.या नियमानुसार ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याचे नगरपंचायती चे मुख्याधिकारी श्री साळवे यांनी सांगितले.