कोरोनाबाधित रुग्णांच्या समस्या निवारणासाठी गडचिरोली युवक कांग्रेस पुढे सरसावली.

179

कोरोनाबाधित रुग्णांच्या समस्या निवारणासाठी गडचिरोली युवक कांग्रेस पुढे सरसावली.

गडचिरोली युवक कांग्रेसच्या वतीने कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी फिरते मदत केन्द्र सुरू.

गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चाललीय.जिल्ह्यच्या ठिकाणी असलेल्या कोविड रुग्णालयात दुर्गम भागातून रुग्ण उपचारासाठी येत आहे.यावेळी रुग्णाना योग्य उपचार मिळावे त्यांची हेळसांड होवू नये.तसेच रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांच्या समस्या निवारणासाठी गडचिरोली युवक कांग्रेसने मदतीसाठी पुढाकार घेतला असून.त्यांनी गडचिरोली जिल्ह्यत फिरते मदत केंद्र सुरू केले आहे.

या मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून देणे. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे. रुग्णांना इंजेक्शन व इतर अडचणींचे निवारण करणे,रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था करून देणे.बाहेर जिल्ह्यत अडकलेल्या रुग्णांच्या अडचणी त्वरित दूर करणे.रुग्णांची उपचारादरम्यान हेळसांड होत असल्यास त्याचे समस्या निवारण करणे.रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास त्वरित रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून देणे. मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकूड उपलब्ध करून देणे.अशा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या विविध अडचणीसाठी गडचिरोली युवक कांग्रेस पुढे सरसावली आहे.

याकरिता खाली दिलेल्या युवक कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी वर संपर्क करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

श्री.महेंद्र ब्राम्हणवाडे-8830737890

श्री.मिलिंद खोब्रागडे 9421854508

श्री.आकाश परसा 9403232871

श्री.रजनीकांत मोटघरे 9421734195

श्री. गौरव येनप्रेडीवार9588643187

श्री.नितेश राठोड 9422680412

श्री.पिंकू बावणे 8806259870