Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाच्या स्किलिंग इन्स्टिट¬ूटच्या माध्यमातून चार चाकी वाहन चालक प्रशिक्षण घेतलेल्या...

गडचिरोली पोलीस दलाच्या स्किलिंग इन्स्टिट¬ूटच्या माध्यमातून चार चाकी वाहन चालक प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप समारंभ संपन्न

38

 

गडचिरोली पोलीस दलाच्या स्किलिंग इन्स्टिट¬ूटच्या माध्यमातून चार चाकी वाहन चालक प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप समारंभ संपन्न

* अतिदुर्गम भागातील एकूण 180 प्रशिक्षणाथ्र्यांना प्रशिक्षणाचा लाभ
* आतापर्यंत एकूण 1310 युवक-युवतींना मिळाले चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण

गडचिरोली जिल्ह्रातील माओवादग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत जिल्ह्रातील युवक-युवतींना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातुनच त्यांची आर्थिक समृध्दी व्हावी तसेच त्यांना नोकरी मिळविणेकरीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली स्किलिंग इन्स्टिट¬ुट पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान अंतर्गत चार चाकी वाहन चालक प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप समारंभ आज दि. 28/03/2026 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पडला.

गडचिरोली पोलीस दलामार्फत दिनांक 24/02/2026 ते 27/03/2026 या कालावधीमध्ये जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगारांकरीता चार चाकी वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर चार चाकी वाहन चालक प्रशिक्षणामध्ये गडचिरोली, कुरखेडा, पेंढरीसह इतर उपविभागातील 120 पुरुष व 60 महिला असे एकूण 180 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणाथ्र्यांना चार चाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन त्यांना लर्निंग परवाना काढून देण्यात आला असून कायमस्वरुपी परवानाही काढून दिला जाणार आहे. स्किलिंग इन्टिट¬ूट, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोलीच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण 1310 युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन कायमस्वरुपी परवाना काढून देण्यात आला आहे. या निरोप समारंभप्रसंगी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येऊन अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी सर्व प्रशिक्षणाथ्र्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर निरोप समारंभ पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमकें त्याचप्रमाणे नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके तसेच पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Don`t copy text!