Home Breaking News _*निलज येथे रात्रकालीन हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा: निलज संघाने पटकावले...

_*निलज येथे रात्रकालीन हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा: निलज संघाने पटकावले विजेतेपद*_

74

_*निलज येथे रात्रकालीन हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा: निलज संघाने पटकावले विजेतेपद*_

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण सोहळा संपन्न*_

 

ब्रम्हपुरी / प्रतिनिधी :

_निलज येथील जय बजरंग क्रिकेट क्लबच्या सौजन्याने आयोजित NILAJ PREMIER LEAGUE

चषक भव्य रबरी बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. दिनांक 18 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना जय बजरंग क्रिकेट क्लब निलज आणि वडसा क्रिकेट क्लब, रुई संघ यांच्यात रंगला. अंतिम सामन्यात रोमांचक खेळाचे प्रदर्शन करत निलज संघाने वडसा संघावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत वडसा संघाने उपविजेतेपद, तर रुई संघाने तृतीय स्थान पटकावले._

_*या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.*_

_यावेळी प्रमुख अतिथी आणि मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाला.अन्नाजी ठाकरे बापुसाहेब रुई,माजी पंचायत समिती सदस्य.ब्रम्हपुरी, थानेश्वर कायरकर,तनय देशकर जिल्हासचिव भा.चंद्रपुर,यशवंत आंबोरकर संचालक कृ.उ.बा.स.ब्रम्हपुरी, अरुण शेंडे मा.ता.अध्यक्ष भा. ब्रह्मपुरी, हेमंत ठाकरे सरपंच निलज, शंकर कोपुलवार उपसरपंच निलज, अशोक भुते निलज, नारायण मेश्राम ग्रा.प. सदस्य निलज, आकाश खंडाळकर ब्रम्हपुरी,साकित भानारकर ब्रम्हपुरी,सोनाली मॅडम,डॉ.इमरानी मॅडम ब्रम्हपुरी,चेतन खरवडे रुई,कुणाल मैंद निलज,राहुल मैंद निलज,विठोबा बुराडे,धर्मपाल राहटे,कैलास ठाकरे, सचिन भरै, प्रदिप बुराडे,आदी मान्यवरांची उपस्थिती होती._

_बक्षीस वितरणप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रमोदभाऊ चिमूरकर यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे स्थानिक तरुणांना सकारात्मक दिशा मिळते, खेळाच्या माध्यमातून सामाजिक साक्षरता वाढते आणि युवकांच्या कौशल्याला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले._

_या स्पर्धेत विजेत्या संघाला विजेता संघ (निलज) – ₹31,001 रोख, उपविजेता संघ (वडसा) – ₹21,001 रोख, तृतीय संघ (रुई) – ₹11001 रोख पारितोषिक देण्यात आले. याशिवाय, वैयक्तिक पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट किपर, बेस्ट कवर ड्राइव्ह, प्रथम हॅट्रिक, बेस्ट फिफ्टी, बेस्ट अंपायर इत्यादी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले._

_ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली. मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहून खेळाचा आनंद घेतला. उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा यशस्वी झाली. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी व खेळसंस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा असल्याचे सर्व उपस्थितांनी एकमताने व्यक्त केले._

Don`t copy text!