जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी आणि त्यामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा–शिवसेना

150

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी आणि त्यामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा–शिवसेना

गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथील रेमेडेसिविंर इंजेक्शन चोरी आणि त्यामुळे झाल्लेल मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि सदोष मनुष्य वधाचा गुन्हा करा अशी मागणी शिवसेना गडचिरोली यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्याकडे केली आहे.या प्रकरणाचा आता पोलीस काय भूमिका घेतात हे लवकरच या कडे लक्ष लागले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथील आरोग्य परिचारिका पल्लवी मेश्राम ने येथील १२ रेमेडेसिवीर इंजेक्शन ची चोरी करून नागपूर च्या काळाबाजारात विकल्याचे उघडकीस आल्याने तिला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. तिने १२ इंजेक्शन चोरी केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी सांगितले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे सेवा देतांना पल्लवी मेश्राम हिने चोरी करण्यास तिला आरोग्य विभागातील कोणी मदत केली.कोरोना वार्डात ती सेवा देताना इंजेक्शन न मिळाल्यामुळे किती रुग्ण मृत्यू पडले याचा सखोल तपास करून तिच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय शृंगारपवार,उपजिल्हा प्रमुख राजूभाऊ कावळे,संघटक नंदू कुमरे,वासुदेव शेडमाके,गडचिरोली तालुका प्रमुख गजानन नैताम यांनी निवेदन द्वारे केली आहे.