शासनाने गोरगरीब मजूराच्या बॅंक खात्यात दरमहा पाच हजार रुपये जमा करा :-
जिल्हा परिषद सदस्य: -सौ रूपालीताई पंदिलवार
गडचिरोली:- महाराष्ट्रातील कोरोणा रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने लाकडावून जाहिर केले असल्याने या कोरोणाच्या संकटात गडचिरोली जिल्ह्यातील मजूर बाहेर गावी काम करण्याकरिता गेले होते परंतु लाकडावून जाहिर झाल्याने या मजूराना काम सोडून घरी परत यावे लागले व या वर्षी अती पावसाने वैनगंगा नदिला महापूर आल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गरीब मजूराना हाताला कोणत्याही प्रकारचे काम नाही व या कोरोणाच्या संकटात बाहेर पडता येत नाही या करिता शेतकरी. काम करणारे गरीब मजूर यांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे करीता शासनाने याकडे लक्ष देऊन कोरोणाच्या संकटात बंद असलेले सलून. कापड घरकामगार दूकानदार व छोटे व्यावसायीक रिक्षा चालक ऑटो रिक्षा चालक अल्पभूधारक शेतकरी बेरोजगार. गरीब मजूराना शासनाने दरमहा पाच हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यात यावे अन्यथा मोल मजूरी करून आपले संसाराचा गाडा हाकलत असणाऱ्यावर उपासमार होऊ शकते हे नाकारता येत नाही करिता शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन या संकटात उपासमारीची वेळ येऊ न देता लवकरात लवकर बॅंक खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी
जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांचे कडून होत आहे.