Home कोरोना आरमोरी उपजिल्हारुग्णालयास शिवसेना व युवासेने तर्फे ऑक्सिजन सिलेंडर चा पुरवठा

आरमोरी उपजिल्हारुग्णालयास शिवसेना व युवासेने तर्फे ऑक्सिजन सिलेंडर चा पुरवठा

283

आरमोरी उपजिल्हारुग्णालयास शिवसेना व युवासेने तर्फे ऑक्सिजन सिलेंडर चा पुरवठा

आरमोरी:-  येथील रुग्णालयात कोरोना संसर्गाचे 20 ते 25 रुग्ण भरती असून ऑक्सिजन कमी असलेल्या रुग्णांना कोरोना उपचारा सोबतच ऑक्सिजन ची फार आवश्यकता असते,ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास रुग्ण मृत्यूमुखी पडू शकतो,
ही बाब माजी युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे व नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सागर मने यांच्या लक्षात आली असता त्यांनी ताबडतोब रुग्णालयाला भेट देऊन त्यांनीही वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर छाया उईके यांची भेट घेऊन परिस्थिती समजून घेतली,व ही बाब माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या लक्षात आणून दिली,माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनात किरणभाऊ पांडव यांचे पुढाकाराने तात्काळ आरमोरी उपजिल्हारुग्णालयाला 100 ऑक्सिजन चे सिलेंडर देण्याचे ठरविले असून,25 सिलेंडर ची पहिली खेप माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल,माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, माजी युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे,बांधकाम सभापती सागर मने,माजी शहरप्रमुख भूषण सातव, शैलेश चिटमलवार, डॉक्टर अनिल उईके यांच्या सहकार्याने आरमोरी रुग्णालयाला देण्यात आली। या प्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षक डॉक्टर छाया उईके व कर्मचारी उपस्थित होते।

Don`t copy text!