Home कोरोना गडचिरोली जिल्ह्यातील बँक कामकाजाच्या वेळेत बदल

गडचिरोली जिल्ह्यातील बँक कामकाजाच्या वेळेत बदल

422

गडचिरोली जिल्ह्यातील बँक कामकाजाच्या वेळेत बदल

गडचिरोली,(जिमाका)दि.03:- व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, गडचिरोली यांनी 15 एप्रिल 2021 पर्यंत गडचिरोली जिल्हयातील सर्व बँकेचे ग्राहक सेवा व्यवहाराबाबतचे कामकाज हे सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांना विनंती केलेली होती. यानूसार अर्थिक व्यवहार व गरज लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांनी गडचिरोली जिल्हयातील सर्व बँकांचे ग्राहक सेवा व व्यवहाराबाबतचे कामकाज हे सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु राहतील असे आदेश निर्गमित केले आहेत. तसेच 50% कर्मचाऱ्यांचा उपस्थितीत काम करण्याची परवानगी बँकांना देण्यात आली आहे.

Don`t copy text!