अहेरी तालुका कोव्हीड 19 नियंत्रण समितीची कारवाई.
अहेरी:-
येथे नव्याने सुरू झालेला डाॅक्टर अमोल पेशट्टीवार रुग्णालय म्हणून नावारूपास आलेल्या रुग्णालयास आज अहेरी तालुका कोव्हीड सह नियंत्रण समिती ने धाड मारली व तेथे कोव्हीड रुग्ण आढळल्याने त्या रुग्णालयास सील मारण्यात आले.
या समिती मध्ये अहेरी चे तहसीलदार ओंकार ओतारी, वैदकीय अधीक्षक डॉ कन्ना मडावी, अहेरी तालुका वैदकीय अधिकारी डॉ किरण वानखेडे अहेरी नगरपंचायत चे मुख्याधिकारी अजय साळवे, अहेरी मंडळ अधिकारी , तलाठी कौसर पठाण ,रोशन दरडे व इतर कर्मचारी उपस्थित होते
आज समिती ला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार डॉ अमोल पेशट्टीवार च्या रुग्णालयात धाड मारली त्या चौकशीत मध्ये अनधिकृत पणे रुग्णालयात रुग्ण ऍडमिट करून ठेवण्यात आल्याचे आले ज्याची परवानगी त्यांना अजून पर्यंत मिळाली नसल्याचे लक्षात आले. ऍडमिट असलेल्या सहा रुग्ण मधून 1 रुग्ण हा कोव्हीड ग्रस्त पण असल्याचं आढळल्याने आणि त्याचे उपचारासाठी सुध्दा रीतसर परवानगी घ्यावी लागते. पण सदर दवाखाना संचालकानी अशी कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे कोविड पेशंट भरती करुन त्यांचेवर उपचार सुरु केला होता.या रुग्णालयात दोन ऑक्सीजन सिलेंडर सुध्दा मिळाल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सांगितले.येथी भरती असलेल्या सर्व रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात हलवून त्या रुग्णालयाला सील करण्यात आले.






