Home गडचिरोली गेल्या हंगामाच्या धान्यांची उचल करून उन्हाळी धान्यांची खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी 

गेल्या हंगामाच्या धान्यांची उचल करून उन्हाळी धान्यांची खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी 

160

जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देवून केली मागणी

गडचिरोली :-आदिवासी विविध कार्यकारी संस्था मार्फत धान केंद्र चालवले जाते जिल्हात पावसाळा हंगामा संपले असुन शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले सदर धान्य आज पर्यंत धान खरेदी केंद्राच्या गोदामत धान्य साठा जमा करून ठेवण्यात आले असुन उचल केले नाही त्यामुळे सदर धान्य लवकरात लवकर उचल करणयात यावी.
तसेच जिल्हात दुबारा पिक घेणारे शेतकरी बांधवा मोठ्या प्रमाणात असुन पिक घेतलेले आहे.मात्र आता धान खरेदी केन्द्र बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी विविध सहकारी मार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली.

Don`t copy text!