मारकंडा कंनसोबा येथील वादळी वाऱ्याने घरांचे मोठे नुकसान

176

चामोर्शी : – मारकंडा कंनसोबा येथील वादळी वाऱ्याने घरांचे मोठे नुकसान

चामोर्शी : – तालुक्यात गुरवारच्या रात्रौ 11 वाजताच्या दरम्यान मेघ गर्जनेसह, विज चमकून वादळी वाऱ्यासह पावसाने सुरवात झाली.या वादळी वाऱ्याने तर अक्षरशः कहर केला.
वादळ वाऱा गुरवारच्या रात्री सुरु झाला व शुक्रवार च्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. रात्री 11 वाजता पासून वीज पुरवठा बंदच होती. या वादळात मारकंडा कंनसोबा येथील
काहींच्या घरावरील छपरे उडाले असून येथील नागरिकांचे मोठे नूकसान झाले असल्याने पहिलेच कोरोणा चे संकट चालू असल्याने हाताला कोणत्याही प्रकारेचे काम नाही पडझड झालेल्या घरांची दूरूसती करणे शक्य नाही पावसाळा जवळ येऊन ठेपला असल्याने घरांची दूरूसती करणे गरजेचे आहे करीता मारकंडा कंनसोबा येथील स्थानिक प्रशासनाने नूकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून द्यावी अशी मागणी मारकंडा कंनसोबा येथील नागरिकांकडून केली जात आहे.