आष्टी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची महावितरणकडे मागणी.

161

आष्टी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची महावितरणकडे मागणी.

आष्टी-
आष्टी व आष्टी परिसरातील गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी आष्टी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आष्टी येथील महावितरणच्या अभियंत्याला निवेदन देऊन केली.

मागील अनेक दिवसांपासून आष्टी व आष्टी परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे आष्टी येथील पाणीपुरवठा नियमित होत नसून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक बोंब मारीत आहे.एवढेच नाही तर या खंडित वीजपुरवठ्या मुळे मशीन मध्ये बिघाड येत असून मशीन खराब होण्याची शक्यता आहे.असे झाल्यास पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होऊन ग्रामपंचायतीला विनाकारण आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.आष्टी येथे बँका व पतसंस्था असल्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना विजेअभावी त्रास सहन करावा लागत आहे.

या सर्व बाबीचा गंभीरपणे विचार करून आष्टी व आष्टी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा अशा मागणीचे निवेदन आज ग्रामपंचायत आष्टीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात महावितरण केन्द्र आष्टीचे अभियंता श्री विंचुलकर यांना दिले.मागणी मान्य न झाल्यास महावितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ बेबीताई बुरांडे, माजी सरपंच व ग्रा.प. सदस्य राकेश बेलसरे, ग्रा.प. सदस्य कपिल पाल, ग्रा.प. सदस्य दिवाकर कुंदोजवार,ग्रा.प. सदस्य संतोष बारापात्रे, ग्रा.प. सदस्य छोटू दुर्ग, सूरज देवगडे, सूरज सोयाम,सूरज दुर्गे,परेश मोहुर्ले,आदी उपस्थित होते.