युवक काँग्रेसच्या भोजन वितरण कार्यक्रमात झाले सहभागी
गडचिरोली:- जिल्ह्यात कोरोनाग्रस्त असलेले रुग्ण उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात येत आहेत. त्यांच्या मदतीला येणाऱ्या नातेवाइकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे मागील 23 दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरीत करण्यात येत आहे. या उपक्रमात येथिल प्रतिष्ठित अधियोक्ते (वकील) अॅड. संजय देशमुख व त्यांच्या धर्मपत्नी वर्षा संजय देशमुख हे आपल्या प्रणित व अथर्व या दोन मुलांना सोबत घेऊन भोजन वितरीत केले. त्यांच्याकडे दरवर्षी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र, मागील वर्षी पासून कोरोनामुळे प्रगट दिन कार्यक्रम घेता आले नाही, यांची खंत देशमुख परिवारात होती. प्रत्येक वर्षी आपल्या हातून जोपर्यंत मानव सेवा घडत नाही तोपर्यंत देशमुख परिवार अस्वस्थ असते. मात्र, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरीत करण्यात येत असल्याची माहिती देशमुख परिवाराला मिळाली. या माहितीनुसार देशमुख दाम्पत्य सोमवारी (१७ मे) यांनी पुढाकार घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरीत केले. यामुळे त्यांना माणुसकीचा दर्शन झाल्याचे मत देशमुख दाम्पत्यानी व्यक्त केले. यावेळी पतंजली योग समितीच्या निता पतरंगे, निर्मला कोटावार आदी उपस्थित होते.
तसेच नेहमीच समाज सेवेत पुढाकार घेऊन असलेले, रुग्ण सेवेसाठी झपाटलेले आरोग्य विभागात सेवा देणारे विवेक मून दाम्पत्य यांनी सुद्धा या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भोजन वितरण कार्यक्रमात सहभागी झाले. सेवेचे व्रत घेतलेले मून दाम्पत्य रुग्णांच्या सेवेत २४ तास लागून असतात. आपली सेवा बजावून समाजाचे ऋण फेडण्यासाठी ते धर्मपत्नी ग्रिष्माला सोबत घेऊन समाजकार्यात स्वतः ला वाहून घेतले आहेत.







