महावितरण कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करण्याकरिता निदर्शने
गडचिरोली: मागील वर्ष्याच्या उन्हाळ्यापासून देशात कोरोनाने थैमान घातला आहे.अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील महावितरण कपंनीमधील कर्मचारी जीवाचे रान करून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवत आहेत.परंतु महाराष्ट्र शासनाने आरोग्य कर्मचारी व पोलिसांप्रमाणे महावितरण कर्मचाऱ्याना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित केले नाही .त्याकरिता म.रा.विद्युत कर्मचारी वर्कर्स फेडरेशन या संगटनेकडून मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री याना निवेदन देण्यात आले . त्यानंतरही कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर काळी फीत लावून निदर्शने केली.त्यावेळी सर्कल अद्यक्ष उदयराज पटालिया विभागीय अद्यक्ष रंजन बलमवार विभागीय सचिव राजकुमार हेलवडे,राजेश जागलें, अशोक गायकवाड उपस्थित होते.रंजन बलमवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.