गडचिरोली : –महाराष्ट्रात गेल्या वर्षी पासून कोरोणा विषाणू ने थैमान घातला असून आरोग्य विभाग पोलीस विभाग रात्र दिवस आपले जिव धोक्यात घालून काम करीत आहेत शासनाकडून प्रयत्न चालूच आहे पण कोरोणा कोणालाही घाबरत नाही आहे .
गेल्या वर्षी पासून कोरोणा संकटात सापडलेल्या सलून दूकानदार रिक्षा चालक गरीब मजूर वर्ग. अशे अनेक छोटे व्यावसाइक यांचे काम बंद असल्याने मोठी आर्थीक अडचण निर्माण झाली आहे बाहेर निघला तर कोरोणाची भिती घरी राहून उपाशी पोटी अशी गत झाली आहे. एवढे मोठे संकट शासनावर पडले असून सुद्धा शासनाकडून शरथीचे प्रयत्न चालू आहे तरी कोरोणा सापडत नाही आहे.
या कोरोणाच्या संकटात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आप आपल्या घरी आहेत पण आपला कामधंदा सोडून गेल्या वर्षी पासून कोरोणा संकटात सापडलेल्या मजूर वर्ग आणि सलून रिक्षा चालक छोटे व्यावसाइक हे आपला कुटुंब कसा चालवित आहेत साधी यांची विचारपूस करायला कोणी लोकप्रतीनीधी नाही व गावातील त्याचे कार्यकर्ते सुद्धा फिरकून पाहत नाहीत.
निवडणूक आली की कार्यकर्तेची लाईन लागते मि या पक्षाचा मि त्या पक्षाचा मि निवडून आल्यावर हे करीन ते करीन सांगतात त्याचे ऐकून मतदान करणयाकरीता आपल मतदानाचा हक्क आहे म्हनुन एक दिवसाची मिळणारी मजूरी सोडून मतदान करतो पण संकटाच्या वेळी मतदान राज्याचा विसर पडतो. या कोरोणाच्या संकटात हाताला कोणत्याही प्रकारचे काम नसल्याने आर्थीक अडचणी निर्माण झाल्याने आहेत करीता *कोण उपाशी. आणि कोण* *तूपासी* याची साधी विचारपुस करायला वेळ नाही .
या कोरोणाच्या संकटात कोणावर खरोखरच ऊपासमार आली आहे. त्याची माहिती घेऊन अशांना मदत करण्याची गरज आहे