दिभना भागातील वाघाचा बदाेबस्त करा

176

शिवसेनेतर्फे महिलेच्या कुटुंबाला आर्थीक मदत.

गडचिरोली:- वाघाने हल्ला करुन ठार केलेल्या दिभना गावातील वंदना जेंगठे या महिलेच्या कुटुंबाला शिवसेनेतर्फे आर्थिक मदत देन्यात आली.यापुर्वीसुध्दा या परीसरात काही महिन्यापुर्वी दाेन घटना घडल्याचे व दिभना,गाेगाव,महादवाडी,चुरचुरा,कु_हाडी या परीसरात 3ते 4 वाघांचे वास्तव्य असल्याचे गावकर्यानी सांगीतले.वरील गावात शेतकर्यांचीसंख्या माेठ्या प्रमानात असुन गावाच्या सभाेवताच्या परीसरात शेती आहे.लवकरच शेती हंगामाला सुरवात झालेली असुन वाघाच्या दहशतीमुळे शेतकर्यांना शेतावर जान्यास भिती निर्मान झालेली आहे.वनविभागाने पुढाकार घेवुन या भागातील वाघांना त्वरीत पकडुन जंगलव्याप्त भागात साेडावे जेनेकरुन पुन्हा अशा घटना घडु नये.अन्यथा शिवसेनेच्या वतीने वरील गावकर्यासह तिव्र आंदाेलन छेडन्यात येईल असा ईशारा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सुनिल पाेरड्डीवार व मा.उपजिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी दिला आहे. दिभना या गावातील महिला वंदना अरवींद जेंगठे वय 40 ही काही महिलांसाेबत गावाजवळच्या जंगलात सर्पन गाेळा करन्यास गेली असता जवळच दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले.ही बाब लक्षात येताच शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशाेर पाेतदार,व सहसंपर्क प्रमुख डाँ.रामक्रुष्न मडावी यांचे सुचनेनुसार शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सुनिल पाेरड्डीवार व मा.उपजिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी पुढाकार घेवुन व दिभना गावात जावुन जेंगठे परीवाराला आर्थिक मदत केली.पती बिमार असुन व परीस्थीती हलाखीची असुन संपुर्न कुटुंबाची पालनपाेसनाची जबाबदारी स्व.वंदनावरच हाेती अशा शाेकाकुल असलेल्या परीवाराचे त्यांनी सांत्वन केले.य़ावेळी या गावचे ग्रा.पं.सदस्य धनराज जेंगठे, शिवसेनेचे शाखा प्रमुख दामाेदर गुरनुले,नरेश माेहुर्ले,शिवसैनीक नरेश चुटे,प्रवीन रामगीरवार,स्व.वंदना हीचे पती अरवींद जेंगठे व मुलगी पुजा वय 21 तसेच गावातील नागरीक हजर हाेते.वनविभागाकडुन आर्थीक मदत मिळवुन देन्याची ग्वाही त्यांनी दिली.