होमराज उपासे यांचे निधन

191

गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते होमराज दादाजी उपासे यांचे अल्पशा आजाराने आज 27मे रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान सकाळी 10 वाजता निधन झाले.
मृत्यूसमयी ते 36 वर्ष्याचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,आईवडील, भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.त्यांनी काही वर्षे दै. देशोन्नती गडचिरोली जिल्हा कार्यालयात उपसंपादक म्हणून कार्य केले होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.