छत्तीसगढ सीमेला लागून असलेल्या कोर्लामाल येथे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन

180

कोर्ला गावाला भेट देणारे कंकडालवार ठरले पहिले लोकप्रतिनिधी

सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यातील नक्षलग्रस्त व अविकसित ,आदिवासी क्षेत्र असलेल्या तसेच छत्तीसगढ सीमेला लागून असलेल्या कोर्ला माल येथे रविवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन पार पडला.

येथील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणी नंतर व संबंधित क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्या सरिता तैनेनी यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंकडालवार यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या खडीकरणासाठी 45 लाख रु.मंजूर केले. सदर रस्ता हे सिरोंचा तालुक्याचे शेवटचं टोकं व छत्तीसगढ राज्याला लागून असलेल्या पातागुडम ला जोडणार आहे.

नक्षल्यांचे बालेकिल्ला व अविकसित क्षेत्र असलेल्या कोर्लामाल या गावाला भेट देणारे अजय कंकडालवार हे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष ठरले. रस्त्याचे भूमीपूजनानंतर जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी येथील ग्रामस्थांशी स्थानिक गोंडी व माडिया भाषेतूनच संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या दौऱ्यात जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी कोर्ला माल सह कोपेला,रमेशगुडम,किष्टय्यापल्ली आदी गावातील समस्या जाणून घेत सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे त्यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली. पहिल्यांदाच नक्षलग्रस्त गावांमध्ये एका राज्यमंत्री पद दर्जाचे लोकप्रतिनिधी खडतर प्रवास करीत त्यांची समस्या आस्थेने विचारपूस करून जाणून घेतल्याने या गावांमधील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

कोर्लामाल येथील खडीकरण रस्त्याच्या भूमीपूजना प्रसंगी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे समवेत आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम, आविसचे ज्येष्ठ नेते,मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, कोर्लामाल चे सरपंच गणपत वेलादी, जि.प.सदस्य सरिता तैनेनी, आविस सल्लागार रवी सल्लम,बामणीचे सरपंच अजय आत्राम, आसरअल्लीचे सरपंच रमेश मेकला,बांधकाम विभागाचे उपअभियंता मसे,अंकुलू जनगम,सत्यम बेल्लमकोंडा, विजय सावकार रेपालवार, श्रीनिवास दुर्गम,वासू सपाट,साई मंदा, प्रशांत गोडशेलवार, राकेश अल्लूरवार, उपसरपंच वग्राम पंचायतचे सर्व सदस्यगण, आविसचे परिसरातील कार्यकर्त्यांसह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्तीत होते.