आष्टी ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा
आष्टी-
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिन शिवराज्य दिन म्हणून आष्टी ग्रामपंचायती च्या कार्यालयात स्वराज्यगुढी उभारून व भगवा ध्वज फडकाऊन उत्साहातसाजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 साली रायगडावर राज्यभिषेक झाला होता.या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.या दिनाचे महत्व अधिक दृढ होण्याससाठी 6 जून हा दिवस महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हापरिषद कार्यालयामध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सद्या कोरोनामुळे संकटाचा सामना करावा लागत आहे.या विपरीत परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्याचा आदर्श घेऊन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनकल्याण कार्य करण्यावर भर दिला जाईल.असे यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
आष्टीच्या सरपंच सौ बेबीताई बुरांडे यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारून भगवा ध्वज फडकाविण्यात आला.तसेच कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशील डोर्लीकर,ग्रामपंचायत सदस्य राकेश बेलसरे श्री दिवाकर कुंदोजवार,कपिल पाल, संतोष बारापात्रे,छोटू दुर्गे, सौ रेश्मा फुलझेले, सौ लाजवंती औतकार,सौ पूनम बावणे, सौ विद्या जूनघरे,सौ लता पोरटे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते