पक्ष बळकटीसाठी जनहिताचे कामे जोमाने करा आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन

303

सिरोंचा येथे रा.काँ. कार्यकर्त्यांची आढावा बैठक
बूथ कमिट्या स्थापित करण्यासाठी लक्ष वेधले!

सिरोंचा:- पक्ष वाढीसाठी व पक्ष बळकटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनहिताचे कामे जोमाने करावे असे आवाहन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते सिरोंचा येथे सोमवार 7 जून रोजी सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य सचिव संजय कोचे, रा.काँ. चे महिला तालुकाध्यक्षा मनीषा चल्लावार,उपसभापती रिक्कूला कृष्णमूर्ती, विश्वेश्वरराव कोंड्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, कार्यकर्त्यांनी जनहितार्थाचे कामे मोठ्या जोमाने केल्यास आपोआप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी व उभारी मिळते असे म्हणत कोरोनाच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्यांनी गोर गरिबांना मदत व प्रत्येक गांव कोरोना मुक्तीसाठी लसीकरणा करिता पुढाकार घेण्याचे आवाहन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व शाहीन भाभी हकीम यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय- धोरणे प्रत्येक घराघरात पोहचणे अत्यावश्यक असून बूथ कमिटीच्या माध्यमाने हे शक्य असल्याने बूथ समितीवर अधिक लक्ष वेधून यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामकीष्टु नीलम,गडचिरोली शहर उपाध्यक्ष कपिल बागडे, सिरोंचा तालुका कोषाध्यक्ष मदनय्या मादेशी, सचिव एम.डी.शानु, माजी नगरसेवक नागेश्वर गागापूरवार, नागरेड्डी गोडीमेटला आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.