छ.शिवाजी महाराज यांचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे – उपसरपंच भारत कनाके
चामोर्शी( 6 जून ) :- आज ६ जूनला २०२१ सकाळी 8 वाजता चंदनखेडी ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला आहे.
भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
” छत्रपती शिवाजी महाराज यांचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपसरपंच भारत कनाके यानी बोलतांना व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. सूर्यास्ताला राजदंड स्वराज्य गुढी खाली घेण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.म्हणून हा दिवस शिवराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. चंदनखेडी गावातील या कार्यक्रमाला उपस्थिती बंडू शेडमाके दौलत आत्राम मोरेशवर चरडे पोलीस पाटील गामपंचायत सदस्य व गावातील गणमान्य व्यक्तीची उपस्थिती होती . या कार्यक्रमाला यशस्वी करण्यारीता ग्रा .पं कर्मचारी यांनी परिश्रम केले.







