आलापल्लीत कार्यकर्त्यांचे आढावा बैठक
अहेरी:- राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी, कष्टकरी, कामगार व महिलांचे धोरण राबविणारा एकमेव पक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य वाढवा असे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेत बुधवार 9 जून रोजी अहेरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार धर्मराव बाबा आत्राम होते. तर मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, रा.काँ. चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, पक्षाचे महिला जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम, बबलू भैय्या हकीम, सरपंच शंकर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्य आ.धर्मराव बाबा आत्राम व मान्यवरांच्या शुभहस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिसमोर दीप प्रज्वलित व अभिवादन करून आढावा बैठकीचे शुभारंभ करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून पुढे बोलतांना आ.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, व्यक्ती व नेत्या पेक्षा पक्ष मोठा असून पक्षाला मजबूत बनविले तर आपोआप व्यक्ती, कार्यकर्ता व नेता मोठा होत असतो त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य व ध्येयधोरणे घराघरात पोहचवून पक्षाचे प्राबल्य वाढवा असे म्हणत कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
याचवेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम , सरपंच शंकर मेश्राम आदींनी सुद्धा बूथ कमिटी,पक्षाची बांधणी व पक्ष विस्तारा संबंधात विस्तृत मार्गदर्शन केले.
याचवेळी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात व अहेरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदांवर निवड करून आमदार धर्मराव बाबा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक रवींद्र वासेकर यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय कोचे, योगेश नांदगाये, श्रीनिवास विरगोनवार,लक्ष्मण येरावार, आशाताई पोहणेकर , पुष्पाताई अलोने, पूर्वाताई दोनतुलवार, इरफान पठाण, मखमुर शेख, महेश अलोने, कैलास कोरेत,सोमेश्वर रामटेके, बुधाजी सिडाम, वासुदेव पेद्दीवार, सालय्या कंबालवार, राहुल गर्गम, मनोज बागडे, शुभम चिंतावार आदी उपस्थित होते.