पोलीस दादालोर खिडकीचा’ लाभ नागरिकांनी घ्यावा: सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे
मुलचेरा:- आज दिनांक १० जून गुरुवार ला पोलीस स्टेशन मुलचेरा येथे पोलीस दादा खिडकीचे उदघाटन मा.तहसीलदार कपील हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी नागरिकांना पोलीस दादालोर खिडकीचा लाभ घ्यावा असे आव्हाहन केले. दुर्गम भागातील नागरिकांना विविध कामासाठी सरकारी कार्यालयात तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते व अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांचा वेळ पैसा खर्च होतो. तरी कामे होत नाहीत.उदा संजय गांधी निराधार योजना, नवीन विहीर खोदकाम,मुख्यमंत्री सौर ऊर्जा,कृषी पंप योजना,ऑनलाईन सातबारा,काटेरी कुंपण योजना,जातीचा दाखला, शेततळे, नरेगा जॉब कार्ड,अपंगत्व प्रमाणपत्र, बस पास सवलत इत्यादी शासकीय कामे तसेच इतर योजना एकाच ठिकाणी पार पडावे म्हणून मुलचेरा पोलीस स्टेशन तर्फे दादालोर खिडकी चालू करण्यात आलेली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. या वेळी कार्यक्रमाला उपस्थित मुलचेरा पंचायत समितीच्या सभापती सौ.सुवर्णा ताई येमुलवार, उपसभापती सौ.प्रगतीताई बंडावार, विवेकानंदपूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.भावना मिस्त्री,तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊसाहेब जवरे,गटविकास अधिकारी युवराज लाकडे,मुख्याधिकारी अजय साबळे,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे,कोठारी ग्रामपंचायत चे उपसरपंच मनोज बंडावार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.