सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांच्या कडून वृद्धांना जीवनावश्यक वस्तु ,नास्ता व फळ वाटप

114

 गडचिरोली:- पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक बांधिलकी जोपासत स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथे वृद्धांना जीवनावश्यक वस्तू , नास्ता फळांचे वाटप करण्यात आले.
प्रविण चन्नावार हे दरवर्षी न चुकता स्वतःच्या व कटुंबियाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व गोरगरीब विद्यार्थी व वृद्धांना मदत करून वृद्धासोबत वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमचे संस्थापक सुनील पोरेड्डीवार, नितीन संगीडवार, मनोज बोममवार,अमोल यामपलवार,इशिका चन्नावार,गणेश भांडेकर, समीर पोटावी,गीतेश पोटावी भुरकाबाई रोहनकर उपस्थित होते.