आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील रेपनपल्ली येथे चक्काजाम आंदोलन
मागण्यासाठी 20 गावातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
अहेरी :- स्थानिक लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे वैतागून कमलापूर परिसरातील जवळपास 20 गावातील नागरिक आपल्या क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी लगबग 3 ते 4 तास आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गवरील रेपनपल्ली येथे फाट्याजवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
दक्षिण अहेरी उपविभागामधील कमलापूर हे भाग राष्ट्रीय महामार्गावर येतो परंतु कमलापूर क्षेत्रातील जवळपास 60 गावे मूलभूत मूलभूत सुविधांपासून वंचित आहे दुर्गम भागात जायला पक्के रस्ते नाही अनेक भागात विद्युत सेवा पण पोहोचली नाही जसा विकास हवा होता तसा विकास कोणत्याही या भागात झालेला नाही लोकप्रतिनिधी व शासनाच्या लक्ष केंद्रित करण्यासाठी भ्रष्टाचार निवारण समिती व गावकऱ्यांकडून सिरोंचा मार्गावर कमलापूर फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले, यात 3 तास वाहतूक पूर्णपणे या राष्ट्रीय महामार्गावर बंद होती.
या आंदोलनात रजनीता मडावी ग्रामसभा पॅनल अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ खरवडे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन जिल्हा अध्यक्ष गडचिरोली राजेंद्र चौधरी अमोल भट कैलास कोडापे प्रकाश दुर्गे यासह अन्या शिष्टमंडळ तसेच 20 गांवातील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच ग्राम पंचायत सदस्य समेत आदी उपस्थित होते. विकासाकडे शासन लक्ष केंद्रित करण्याचे काम हे आंदोलन मार्फत करण्यात आले.
या आहेत प्रमुख्य मागण्या.
1. अतिक्रमण धारकांचे तिनपिढी पुरावा ही अट रद्द करा, 2. छल्लेवाडा येते स्वतंत्र ग्राम पंचायत निर्मिण करा. 3. वन मजुरांचे थकीत रक्कम त्वरित देण्यात यावे. 4. कमलापूर येते मंजूर असलेले मंडळ कार्यालय त्वरित बांधकाम करावेत. 5. कमलापूर येथे मंजूर असलेले 33 केवी विद्युत उपकेंद्र निर्माण करावे. 6. दामरंचा बससेवा व 3 जी नेटवर्क सुरू करावे. 7. लक्कामेंडा पहाड पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून विकास करून बेरोजगाराना रोजगार उपलब्ध करून द्यावे. 8. कमलापूर येते महाविद्यालय निर्माण करावे. 9. वन उपज गोळा करण्यासाठी व्यवस्था खरेदी व विक्री केंद्र सुरू करावे. ( मध मोह डिंक ) 10. आलापल्ली सिरोंचा मार्गाची चौकशी करून दोषी आढळल्यास कंत्राटदार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे. 11. अहेरी सिरोंचा वाया कमलापूर छल्लेवाडा राजाराम मार्गे बस सेवा सुरू करावे. 12. कमलापूर येते नवीन तलावाचे शिल्लक खोलीकरण व कँनल बांधकाम करण्यात यावे अशी एकूण 12 मागण्या ग्रामसभा पॅनल, कमलपूर व छल्लेवाडा स्वतंत्र ग्राम पंचायत निर्माण समिती यांनी मागणी केली आहे.
3 तासा नंतर मिळाला चारचाकी धारकांना दिलासा
सदर रास्ता रोको आंदोलन स्थळी नायब तहसीलदार फारुक शेख, मंडळ अधिकारी आर पी सिडाम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांनी भेट देऊन आंदोलन कर्त्यांचे समस्या वरिष्ठांपर्यंत पोचवण्याचे आश्वासन देण्यात आले व आंदोलन थांबवून दळणवळणासाठी मार्ग मोकळा करण्यात आले.