अहेरीच्या जन आक्रोश आंदोलनात शिवसेनाही आक्रमक

134

भाव वाढ तात्काळ कमी न केल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा रियाजभाई शेख यांचा ईशारा

केंद्रसरकार विरोधात संतापाची लाट

अहेरी:- केंद्र व मोदी सरकार इंधन गॅस, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढ करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवार 4 जुलै रोजी येथील मुख्य चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाला शिवसेना पक्षाने पाठींबा दर्शवून शिवसेना सुद्धा आक्रमक बनली आहे.
यावेळी शिवसेनेचे अहेरी विधानसभेचे जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख यांनी, जनआक्रोश आंदोलनात सहभागी होऊन केंद्र व मोदी सरकारवर तीव्र शब्दात निषेध करून चीड व संताप व्यक्त केले. आणि केंद्र व मोदी सरकार आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ भाववाढ कमी न केल्यास यापुढे मोठे जनआंदोलन उभारण्याचा ईशाराही दिले. एकंदरीत गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच केंद्रशासनाशी निगडित तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई व भाववाढीमुळे केंद्र व मोदी सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. यावेळी शिवसेनेचे अहेरी उपजिल्हाप्रमुख अरुण धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, दिलीप सुरपाम, प्रफुल्ल येरणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.