खरीप हंगाम 2021 साठी 15 जुलैची अंतिम मुदत
मुलचेरा :- शासनाने खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असुन, या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. याबाबत संबंधीत कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या जनजागृती प्रचार रथाला मुलचेरा तालुका चे तहसीलदार श्री.कपिल हटकर साहेब यांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसुचित खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के, नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. . तरी शेतकरी विहित मुदतीपुर्वी नजीकच्या बँकेत अथवा आपले सरकार केंद्रावर विमा हप्याल सह आणि आवश्यक कागदपत्रांसह शेतकऱ्यांना जावे असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचे हिरवी झेंडी दाखवताना उपस्थित विकास पाटील तालुका कृषी अधिकारी व सतीश निभाळकर कृषी अधिकारी मुलचेरा.सोनाली सुतार मंडल कृषी अधिकारी मुलचेरा.मनोहर दुधबवरे कृषी पर्यवेक्षक. वि. हरगुळे कृषी पर्यवेक्षक सांख्यिकी .उत्तम खंडारे कृषी सहायक .वाघमारे कृषी सहायक. राजेश गुंतीवार पीक विमा प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.