गडचिरोली:- सदर कार्यक्रमांस मा.तहसीलदार गणवीर सर , मंडळ कृषी अधिकारी चलकलवार साहेब, कृषी साहाय्य्क् मुद्दमवार साहेब उपस्थित होते.शासनाने खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असुन, या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसुचित खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के, नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. तरी विहित मुदतीपुर्वी नजीकच्या बँकेत अथवा आपले सरकार केंद्रावर विमा हप्त्या सह आणि आवश्यक कागदपत्रांसह शेतकऱ्यांना जावे असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.