आज पहिल्या टप्प्यातील सहा तालुक्यातील अंदाजित मतदान 82.18 टक्के

105

सहा तालुक्यातील अंदाजित मतदान 82.18 टक्के

गडचिरोली,(जिमाका)दि.15:   आज, दि. 15 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यातील मतदान दुपारी 1.30 वा.पर्यंत 70.16 टक्के नोंदविले गेले. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा तालुक्यातील प्रत्यक्ष मतदान झालेल्या 170 ग्रामपंचायतींमध्ये अंदाजित 82.18 टक्के मतदान झाले आहे. अंतिम आकडेवारी उद्या सकाळी जाहीर होणार आहे. या मतदानात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या तालुक्यातील 170 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूका झाल्या.

जिल्हयातील सहा तालुक्यांमधील 170 ग्रामपंचायतीमधील अंदाजित अंतिम आकडेवारी

कोरची 14 ग्रामपंचायती – 79.55 टक्के (एकुण-10957- पु.5583 स्त्री.5374)

कुरखेडा 39 ग्रामपंचायती – 84.09 टक्के (एकुण-39726 – पु.20454 स्त्री.19272)

देसाइगंज 17 ग्रामपंचायती – 84.49 टक्के (एकुण-30338- पु.15474 स्त्री.14864)

आरमोरी 27 ग्रामपंचायती – 80.30 टक्के (एकुण-38881- पु.19738 स्त्री.19143)

गडचिरोली 43 ग्रामपंचायती – 83.42 टक्के (एकुण-47769- पु.24476 स्त्री.23293)

धानोरा 30 ग्रामपंचायती – 78.11 टक्के (एकुण-22472- पु.11551 स्त्री.10921)

एकुण 170 ग्रामपंचायती – 82.18 टक्के (एकुण-190143- पु.97276 स्त्री.92867)