मुलचेरा शिवसेना तर्फे शिवसंपर्क अभियानला सुरवात.

101

स्थानीक युवकांचा शिवसेना पक्ष मध्ये शिवबंधन बांधून प्रवेश करून घेतले.

मूलचेरा :- शिवसेना पक्षाचे राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान 12 जुलै पासून प्रारंभ झाले असून शुक्रवार 18 जुलै रोजी मुलचेरा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय मुलचेरा येथे शिवसंपर्क अभियाना अंतर्गत बैठक घेऊन प्रभाग निहाय सविस्तर चर्चा करण्यात आले.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे व गजानन किर्तीकर विदर्भ सम्पर्क प्रमुख आणि प्रकाश वाघ पुर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप यांच्या सहकार्याने अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात शिवसंपर्क अभियान राबवित असून रविवारला शिवसेना अहेरी उपजिल्हा प्रमुख अरूनभाऊ धुर्वे. पौर्णिमा ईस्टंम शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटीका अहेरी, शिवसेनेचे तालुका प्रमुख गौरव बाला, ग्रामीण तालुका प्रमुख काशीनाथ कांनाके .बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख दिपक बिस्वास .युवासेना तालुका प्रमुख राजेश गुंतीवार यांच्या उपस्थितीत मुलचेरा येथील शिवसेना कार्यकर्त्याच्या आढावा बैठक घेतले.
यावेळी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी शहरातील प्रभाग निहाय आढावा घेऊन विकास कामांसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध असून शहराच्या विकासासाठी शिवसेनेचे संघटन वाढवून पक्षाचे ध्येय-धोरणे, पक्षाचे आचार-विचार प्रत्येक घराघरात पोहचवा असे आवाहन करून रियाज शेख यांनी कोरोना मुक्तीसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा असेही मोलाचे मार्गदर्शन यावेळी शिवसैनिकांना केले.
तसेच मुलचेरा नगरात एकूण 17 प्रभाग असून प्रभाग व बुथनिहाय प्रमुखांची नियुक्ती करून व युवा सेनेचे कार्यकारिणी गठीत करण्यात आले असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ उपक्रम राबवून शिवसंपर्क अभियान युद्धपातळीवर राबविण्याचे सूचना करण्यात आले. मुलचेरा आणि गणेशनगर येथील अनेक युवकांनी शिवसेना पक्ष मध्ये प्रवेश केले.
यावेळी शिवसेना चे संजय गांधी निराधार योजना चे तालुका अध्क्षक्ष संजय मंडल.मुकेश ठाकुर उप तालुका प्रमुख मुलचेरा . उत्तम बिस्वास.सुकुमार गायली .सतीश कर्माकर दास.सुरजित कर्मकार.सतीश कर्मकार. सचिन अरके. अमित अधिकारी .राजू मंडल सुकांत बाईन.राहुल सरकार निताई कर्मकर .संदीप रॉय संजीव घरमी .राजू मंडल . व अन्य प्रभाग निहाय शिवसैनिक उपस्थित होते.