धानोरा:- आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री , विदर्भ संपर्क प्रमुख गजाननजी कीर्तिकर साहेब समनवयक प्रकाश वाघ साहेब संपर्क प्रमुख किशोरजी पोद्दार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा तालुक्यातील निमगांव येथें १७-७-२०२१ ला रात्रौ ७.०० वाजता शिवसंपर्क अभियानाची बैठक घेण्यात आली यात शेकडो शिवसैनिक उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनीलची पोरेड्डीवार यांनी गांव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक निर्माण करन्याचे आवाहन केले.आपल्या गावाचा विकास करण्यास आम्ही सदैव आपल्या पाठीशी उभे असल्याबाबत मार्गदर्शन केले.तसेच जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी अभियानाचा ऊद्देश समजावुन सांगीतला प्रत्येक गावात शिवसेनेचे शाखा उघडणार असुन आपल्या गावातील समस्या सोडविण्यात आम्ही कटिबद्ध असल्याचे म्हटले याप्रसंगी धानोरा तालुकाप्रमुख शेखर उईके,महिला उपाध्यक्षा अश्विनीताई चौधरी ,देवरावजी मोंगरकर,गांधीजी कुकडकर,भगवान खोब्रागडे,तुळशीदास कुकङकर,हेमंत भुरसे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते