गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

253

गडचिरोली,दि.22, जिमाका :-  येत्या 24 तासात हवामान विभागाने गडचिरोली जिल्हयात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार किंवा जास्त मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानूसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून नागरिकांना दक्षतेचा इशारा देणेत आला आहे. यामध्ये वीजे पासून संरक्षण करण्यासाठी अकारण बाहेर न पडण्याचे व पूलावरून पाणी वाहत असताना पूल न ओलंडण्याचे आवाहन केले आहे. जिल्हयातील नदी व नाल्यांकाठी राहण्याऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे.