भारतीय ऑलिम्पिक संघास प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन

91

गडचिरोली, दि.22, जिमाका :-  गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात दि.23 जुलै रोजी सकाळी 7.15 वा. भारतीय ऑलिम्पिक संघास प्रोत्साहन देण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गामूळे या कार्यक्रमाला फक्त निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. टोकोओ ऑलिम्पिकच्या उद्घाटनाचे औचित्य साधून दि.23 जुलै रोजी राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली येथे सकाळी 7.15 वा सायकल रॅलीला सुरूवात होणार असून रॅलीची सांगता जिल्हा कॉम्लेक्स येथील क्रीडा संकूलामध्ये होणार आहे.