नक्षल्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात यश.
गडचिरोली-
गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात.असे साहित्य ते मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवतात.व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरीत्या पुरून ठेवतात.तसेच काही ठिकाणी रस्ते व सुरक्षा दलांना धोका होऊ शकेल असे इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्ये ते गोपनियरीत्या जमिनीत पुरून ठेवतात.
25 जुलैला नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करून C 60 व इतर पथकाचे जवानांनी कुरखेडा उपविभागांतर्गत येत असलेल्या पुराडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी गोपनियरीत्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात जवानांना खूप मोठे यश आले आहे.
सदर डंप मध्ये त्यांना कुकर बॉम्ब 1 नग,नक्षल पॅन्ट 1 नग,नक्षल शर्ट 1 नग,पिट्टू 1 नग शाल 1 नग,प्लास्टिक शीट 1 नग,बँडेज पट्टी 1 नग,चिमटा 1 नग,बॅटरी 1 नग,303 खाली केस 1 नग,पेंचीस 1 नग,व पुस्तके 3 नग व इतर साहित्य जप्त करण्यात आले.यापैकी कुकर बॉम्ब हे अत्यन्त सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असून इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे.याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सदर डंप हस्तगत करण्यात आल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.त्यामुळे नक्षल्याना लक्षात आलेले आहे की गडचिरोली पोलिसांची नजर नक्षल्यावर असून सामान्य नागरिकांना वेठीस धरून बळजबरीने नक्षल सप्ताह पाळावयास भाग पाडणे नक्षलवाद्यांना आता अडचणीचे ठरणार आहे.सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकाचे कौतुक केले.तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले.
नक्षलवाद्यांच्या 28 जुलै ते 2 आगस्ट या कालावधी दरम्यान होणाऱ्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधिक्षक सोमय्या मुंडे,उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले,यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात असून जिल्ह्यत नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.