गडचिरोली:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येणापुर येथील दीक्षा बांबोळे हिच्या मृत्यू प्रकरणात आरोपी विनोद जक्कुलवार याच्याविरोधात भांदवी 306 व अँट्रासीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
21 जुलै रोजी दीक्षा बांबोळे हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.मृतक मुलीच्या आईने आपल्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच झाल्याचा आरोप करीत आष्टी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.
याप्रकरणी तपासाला गती देत आष्टी पोलिसांनी आरोपी विनोद जक्कुलवार याला अटक करून त्याच्याविरोधात विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केले असल्याची माहिती आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुमारसिंग राठोड यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर करीत आहे.






