गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूरात स्थानांतरीत करू नका :- कुणाल पेंदोरकर यांची ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी.

90

गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूरात स्थानांतरीत करू नका :- कुणाल पेंदोरकर यांची ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी.
गडचिरोली :- शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या गडचिरोली जिल्हयातील शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयाचे शैक्षणिक कामकाज चालते. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमुळे अनेेक नाविण्यपुर्ण अभ्यासक्रम सुरू झाले असून जिल्हयातील विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक विकासात भर पडत आहे. असे असतांना गोडवाना विद्यापीठ चंद्रपूरात स्थानांतरीत करण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल महोदयांकडे करून गडचिरोलीवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. गडचिरोली जिल्हयाचा शैक्षणिक विकास साधायचा असेल तर विद्यापीठ गडचिरोलीतच कायम ठेवावे, अशी मागणी काॅंग्रेसच्या सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

कुणाल पेंदोरकर यांनी म्हटले आहे की, गोंडवाना विद्यापीठात गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयातील महाविद्यालय समाविष्ट आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यापीठाचे कामकाज सुरळीत सुरू आहे. विद्यापीठाने अल्पावधीतच देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. गोंडवाना विद्यापीठाने अनेक राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरित्या आयोजीत करून आपली छाप पाडली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून प्रत्येक दिक्षातसमारंभाचे योग्यरित्या आयोजन केले आहे. असे असतांना यावर्षी विद्यापीठाचा दीक्षातसमारंभ चंद्रपूरात आयोजीत करण्याचा हेतू काय, असा प्रश्नही कुणाल पेंदोरकर यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी हे चंद्रपूर जिल्हयाच्या दौर्यावर आले होते. त्यांनी ताडोबा येथे भेट दिली. यादरम्यान आ.किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. यामध्ये गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूर स्थलांतरीत करण्याच्या मागणीचा समावेश आहे. विद्यापीठ चंद्रपूरात हलविल्यास गडचिरोली जिल्हयाचा शैक्षणिक विकासावर परिणाम होईल. गडचिरोली जिल्हयाचा विस्तार मोठा असल्याने कोरची धानोरा, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील विद्याथ्र्यांना शेकडो किमीचे अंतर पार करून चंद्रपूरला शैक्षणिक कामासाठी जाणे अडचनीचे होईल. त्यामुळे जिल्हयातील गोरगरीब विद्याथ्र्यांना आर्थिकदृष्टया व त्रासदायक ठरेल. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतच कायम ठेवावे आणि जिल्हयाच्या शैक्षणिक विकासाला गती द्यावी, अशी मागणी काॅंग्रेस सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.