गडचिरोली,प्रतिनिधी :-
दरवर्षी प्रमाणे शहरातील कारगिल चौकात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
स्थानिक कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोली च्या वतीने मागील २१ वर्षा पासून कारगिल युद्धात पाकिस्तान ला शूरवीर भारतीय सैनिकांनी पराभूत केले होते. २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. तसेच गडचिरोली येथे सुद्धा नित्यनेमाने या युद्धात शहीद सैनिकांना श्रदांजली वाहण्यात येऊन विजयी दिन साजरा करण्यात येतो.
यावेळी कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते,सचिव प्रकाश भांडेकर,मार्गदर्शक नरेंद्र चन्नावर, राजू पुंडलिककर,किशोर सोनटक्के,पुरुषोत्तम शेंडे,विलास जुवारे,मोगली मसराम,रुपेश सलामे,श्याम कोल्हटकर आदी उपस्थित होते.